Ad will apear here
Next
रोटरी क्लब नाशिक जिल्ह्यात पाणी नियोजनावर देणार भर


नाशिक : 
‘समाजोपयोगी उपक्रम राबवणाऱ्या रोटरीचे कार्य विश्वव्यापी होत असून, त्यासाठी अधिकाधिक सदस्य नोंदणी करणे ही बाब क्रमप्राप्त आहे. नाशिक जिल्ह्यात पाणी नियोजनावर रोटरीने आपले लक्ष केंद्रित केले असून, नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यांना पाणीटंचाई बाराही महिने भासणार नाही, यासाठी रोटरी क्लब धडपडत आहे. दुष्काळमुक्त नाशिकसाठी रोटरीने ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार केली आहे,’ असे प्रतिपादन नाशिक रोड रोटरी क्लबच्या अध्यक्षा डॉ. रोचना राय-शर्मा यांनी केले.

‘रोटरी क्लब ऑफ नाशिक रोड’ आयोजित वार्षिक आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. नाशिक-पुणे महामार्गावरील हॉटेल क्वालिटी इन येथे झालेल्या कार्यक्रमात मंचावर डॉ. राजेंद्र भामरे, कैलास क्षत्रिय, डॉ. रोचना राय-शर्मा, डॉ. स्नेहल गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते. 

रॉय यांनी रोटरीच्या कार्याची माहिती देताना विभागीय स्तरावर अनेक उपक्रमांची आखणी करण्यात आल्याचे नमूद केले. त्यात ग्रामीण भागात पाण्याचे नियोजन, पोलिओ निर्मूलन फंड उभारणी, प्रौढ साक्षरता व रक्तदान शिबिर या उपक्रमांचा समावेश आहे. रोटरी क्लबच्या सर्वच शाखांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगून, त्यांनी सर्व सदस्यांचे अभिनंदन केले. येत्या जानेवारी महिन्यात शिर्डी येथे होणाऱ्या रोटरीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेबाबतही त्यांनी माहिती दिली. 

आगामी उपक्रमात अपेक्षित ध्येय गाठण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहणार असल्याबाबत रोटरीच्या सर्व सभासदांनी आश्वस्त केले. सूत्रसंचालन अनिल काळे व सुनीता वर्मा यांनी केले. या प्रसंगी फिरदोस कपाडिया, सौमित्र दास, डॉ. ज्ञानेंद्रकुमार गुप्ता, बाळकृष्ण साहू, प्रवीण बिसोई, कुणाल शर्मा, धनंजय जोशी, महेश साळवे, अॅड. दिनेश शिंदे आदींसह रोटरीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

(सोबतचा व्हिडिओ पाहा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZSQCF
Similar Posts
रोटरी क्लबतर्फे २५ शिक्षकांचा सत्कार नाशिक : नाशिक रोड परिसरातील शाळांमधील २५ आदर्श शिक्षकांना ‘रोटरी क्लब ऑफ नाशिक रोड’तर्फे नेशन बिल्डर्स अॅवॉर्ड देऊन सत्कार करण्यात आला.
वीस रुपयांच्या नव्या नोटा चलनात दाखल नाशिक :देशाला चलनी नोटांचा पुरवठा करणाऱ्या नाशिक रोड येथील नोट प्रेसमध्ये सध्या २० रुपयांच्या नोटांच्या छपाईचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. वीस रुपयांच्या नव्या नोटा ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध झाल्या असून, दीपावलीत लक्ष्मीपूजनासाठी या नोटा नेण्याकरिता ग्राहकांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे
पर्यटकांसाठी खूशखबर; नाशिक रोड रेल्वे स्टेशनमध्ये सुसज्ज पेड एसी वेटिंग रूम नाशिक रोड : नाशिक रोड रेल्वेस्थानकात आउटसोर्सिंग तत्त्वावर पेड एसी वेटिंग रूम (व्हीआयपी लाउंज) सुरू होणार आहे. तिकीट बुकिंग ऑफिसच्या वरच्या जागेत सर्व सोयींनी युक्त अशी ही रूम साकारण्यात येत असून, प्राथमिक तयारी पूर्ण झाल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.
नाशिक कारागृहात कम्प्युटर लॅब; ही सुविधा असलेले देशातील पहिले कारागृह नाशिक : साने गुरुजींनी ‘श्यामची आई’ पुस्तक जिथे लिहिले, त्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात अद्ययावत कम्प्युटर लॅब सुरू झाली आहे. कम्प्युटर लॅब सुरू करणारे हे देशातील पहिलेच कारागृह ठरले आहे. मुंबईच्या समता फाउंडेशनच्या सहकार्याने ही लॅब सुरू झाली असून, कैद्यांना रोजगाराभिमुख शिक्षण दिले जाणार असल्याची

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language